STORYMIRROR

Narendra Patil

Others

4  

Narendra Patil

Others

खारीचा वाटा

खारीचा वाटा

1 min
41K


सुसंस्कृत अन् समृद्ध आम्ही

जगाचे मार्गदर्शकही होणार

पण आमच्याच घरात आम्ही खणलेली

विषमतेची दरी सांगा कधी बुजवणार


सहानुभूती दाखवून

नुसतं म्हणू नका बिचारा

विषमतेची झळ सोसणा-यास

जरा अवस्था त्याची विचारा


कमी नाहीत हो गुरं ढोरं

दुध दुभती जनावरं

धन-धान्यही माझ्या देशात

पिकतं, विकतं सारं


योजनांची कमी नाही

शासन करतंय खूप सारं

तरी कुपोषण गिळतंय अजूनि

पाड्या-पाड्यातली पोरं


उघड्या-नागड्या त्या लेकरांसाठी,

मायबापहो.....

सांगा अभिषेकाचा घट का वळत नाही

दगडात दिसतो तुम्हां-आम्हांस

त्या लेकरांत, राम का दिसत नाही


जरा बघा दशा

माझ्या बळीराजाची

जगाचा पोशिंदा

तो स्वत: मात्र उपाशी


सोन्यासारख्या मालाला

किंमत द्याल जराशी

छाती ठोकून सांगतो तुम्हांस

तो चढणार नाही फाशी


तळमळणारी लेकरं

अन् मुसमुसणारा बळीराजा

भवितव्य या देशाचे

यांनीच तर भारत घडवावा


करून थोडं सिंहावलोकन

आत्माराम ओळखावा

वाटा खारीचा उचलून

त्यांना न्याय मिळवून द्यावा


Rate this content
Log in