केशवसुत म्हणाले.......
केशवसुत म्हणाले.......
केशवसुत म्हणाले.......
या अनंतसर्गात कुठे धावतेस?
थांब जरा बघ, तुझ्यासवे चालणारे पाऊलं,आयुष्याचे धागेदोरे जोडत कुठल्याकुठे पोहचलेत?
काय शोधतेस तू?का घुटमळते आदितालावर?
दुवा साधतेस? कुठला ग जुन्याला नव्याने जोडणारा?
कां नव्याला जुन्याने जोडणारा?
का करतेस अशी थट्टा ?
आवरु शकतेस का तू हा अनर्थाचा महासागर?
काय तुझ्या कवितेचे प्रयोजन ?
मी दिला तुला नव्या दमाचा शूर "नवा शिपाई"
तो तुम्ही नाकारलाही नाही आणि स्वीकारलाही नाही
मी स्फूर्ती ने तुतारी फुंकली,ती तुमच्या कानावरही पडली नाही बहुधा
शब्दांनो आता मागुते या..झपुर्झा झपुर्झा कितीदा गुणगुणशील?
बघ घड्याळ,सांगतो आहे सारखा आला क्षण गेला क्षण
विचार कर जगामधी या तुला कशाला परमेशे धाडिले?
अडकु नकोस सतारीच्या बोलात,दिव्यदृष्टीने वाच ईश्वराचा ग्रंथ
कर सिंहावलोकन,घे अनुभुती दिव्यस्वप्नांची आणि घे उदारता फुलांतले गुणांची
आम्ही कोण ? हा प्रश्न मला आजही छःळतो आहे
म्हणून या वियुक्ताचे उद्गार ऎक...फुलपाखरु नको होउस
हो धुमकेतु आणि महाकवि जो लक्षात सदा राही
ध्यानात असु दे माझे हरपलेले श्रेय
जायाचे जग हे असेच नको करु फिर्याद
लिहुन काढ भेदक, रंजक आणि उल्लाट
