STORYMIRROR

Raosaheb Jadhav

Others

5.0  

Raosaheb Jadhav

Others

कॅलेंडर

कॅलेंडर

1 min
904


कॅलेंडर...


खरे तर

असतो उभा मी

जुन्या-नव्याच्या सीमेवर

सरत्या वर्षाच्या शेवटी

आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला

पुन्हा एकदा...


आठवणींची साठवण केलेल्या,

हुकल्या-हुकवल्या,

टळल्या-टाळल्या

पूर्ण-अपूर्ण काही क्षणांसाहित

हिशोबाचे गणित जुळवण्यासाठी

सोबत घेतलेल्या तारीख,

वार, दिनांकांच्या नोंदी

अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या कॅलेंडरची

तग धरून राहिलेली

काही पाने नजरेआड करत

जेव्हा टांगतो खिळ्याला नवे कॅलेंडर

तेव्हाही असतो उभा मी

जुन्या नव्याच्या सीमेवर

पुढील काही दिवस,

आठवडे कदाचित महिनेही...

जे सोडू शकत नाही

तारखेसोबत लिहिताना जुना वर्षांक

सोबत 'नव्याची' असतानाही...


नाहीच सुटत गुंता

जुन्या कॅलेंडरबाबतचा आजही

ज्याने सजवलेला असतो

कोपरा घराचा

कोपरा मनाचा होताना,

जो विकावा मूल्यहीन रद्दीच्या भावात

की जपावा मूल्यवान आठवणींचे गाठोडे म्हणून?

की लोटावा कचरा म्हणून स्वतःच,

इतरांनी कचरा समजण्याआधीच?

होत नाही निर्णय...


आणि आज पुन्हा एकदा

नवे कॅलेंडर टांगून खिळ्याला

चाळतोय मी जुनी पाने

काही चुकून सुटून जाऊ नये संदर्भ

या भीतीपायी

भिंतीलगत राहून उभा...


Rate this content
Log in