STORYMIRROR

Rakesh More

Others

3.4  

Rakesh More

Others

कधीतरी तू येशील

कधीतरी तू येशील

1 min
1.0K


कधीतरी तू येशील 

हा विश्वास आहे माझा 

तुझं प्रेमच सखे जगण्यासाठी  

श्वास आहे माझा ||0||


तुझ्याविना जगणे म्हणजे 

रुक्ष ओसाड रान 

तुझ्याविना आयुष्य म्हणजे 

जन्मोजन्मीची तहान 

तूच माझी कल्पना, तूच 

आभास आहे माझा 

तुझं प्रेमच सखे जगण्यासाठी  

श्वास आहे माझा ||1||


झोकून दिलंय प्रेमात तुझ्या 

पहिल्याच क्षणी तुला पाहता 

माझ्यासारखा कोणी नसेल 

जन्मोजन्मी तुझा चाहता 

तूच माझं सत्य, तूच 

ध्यास आहे माझा 

तुझं प्रेमच सखे जगण्यासाठी  

श्वास आहे माझा ||2||


तुला सोडून जाऊ कुठे 

बंधन हे अतूट आहे 

हृदयाची तूझ्या आठवणींशी 

घट्ट एकजूट आहे 

तूच त्रिज्या, तूच परीघ 

तूच व्यास आहे माझा 

तुझं प्रेमच सखे जगण्यासाठी  

श्वास आहे माझा ||3||


तुझी आठवण हसवून जाते 

अलगद हृदय सुखावून जाते 

जखम माझ्या मनावरची 

निर्दयतेने दुखावून जाते 

तूच सुखाचं कारण आणि 

काळजाचा त्रास आहे माझा 

तुझं प्रेमच सखे जगण्यासाठी  

श्वास आहे माझा ||4||


Rate this content
Log in