STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

कधी कधी

कधी कधी

1 min
16.4K


माझेच रुप मजला हसते कधी कधी

होतीस कोण आधी पुसते कधी कधी ।।१।।


तू सोडलेच नव्हते मज भासले तसे

भणावरीच मीही नसते कधी कधी ।।२।।


माझ्या मनी निराशा येते तुझ्या विना

बागेत चांदण्यांच्या बसते कधी कधी ।।३।।


दाटून कंठ येतो होता स्मृती तुझी

मी चांदण्यात सुद्धा जळते कधी कधी ।।४।।


दारात दुःख जेव्हा येते सुखासवे

त्याला लगेच मी ही भुलते कधी कधी ।।५।।


आयुष्य क्षणभराचे धडपड किती तरी

दुर्भाग्य माणसाला हसते कधी कधी ।।६।।


सारेच भास होते ते खरेच भासलेले

फसल्यानंतर सारे कळते कधी कधी ।।७।।


Rate this content
Log in