कौतुक...!
कौतुक...!
किती छान आहे ग
ही गणेश मूर्ती
किती गोड गोड
आणि प्रसन्न वाटते....!
तुला आवडली काय..?
मग न्हे हवतर तुझ्या घरी
आणि प्राण प्रतिष्ठा करून
छान दोन चार दिवस सण साजरा कर..!
विद्येची देवता म्हणून आम्ही
एकोपा टिकावा, जनजागृती व्हावी
आणि सारी प्रजा सुजाण व्हावी
म्हणून हे सारे सण करतो...!
अग बायी अस हाय होय
मग मी यंदा तुमच्या कडेच येते
आणि गणेशोत्सव मोठ्या
हौसेने साजरा करते,चल जाऊ
तीच निर्मळ मन पाहून
मला खूप खूप छान वाटलं
सार अज्ञानाच दांभिक वळण
पार धुवून निघून गेलं...!
आम्ही मैत्रिणी जिवाभावाच्या
प्रत्येक क्षण, प्रत्येक सण
असाच आनंदात घालवतो
असाच आनंदात साजरा करतो
बर वाटत छान वाटत
एक तीळ सात जणात वाटून खाताना
आणि मोठ्या प्रेमाने विश्वासाने
एकमेकींच्या साथीने जीवन जगताना...!
