STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

काय नशीब माझं...!!

काय नशीब माझं...!!

1 min
14.1K


काल बाजारात कोंबड्यांच्या

मोठ्या ऐटीत उभा होतो

सकाळी सकाळी पहाटं

मोठं मोठी बांग देत होतो


माझी ऐट पाहून

सारे कौतुकाने येत होते

कारण नसताना उगाचच

भाव विचारून जात होते


किती किती अप्रूप

माझ्या जीवाला वाटत होतं

परमेश्वराचे आभार मनोमन

हृदय माझं मानत होतं


अचानक एक म्हातारा

माझ्या जवळ आला

निरखून पारखून झाल्यावर

भाव विचारता झाला


सहाशे रुपये दाम ठरले

नकद हातात टेकवून मला उचलले

काखोटीला मारून घरी आणले

खाटला बांधू बापड्यानं हात धुतले


तीन चार दिवस झाले

रोज त्यांची बोलणी ऐकतोय

महाग पडलं महाग पडलं म्हणून

रोज स्वस्त होण्याची वाट बघतोय


वाटलं बापड्यानं कौतुकानं

मला आणलं असावं पण

माझ्यात किती मौस निघणार

यावर आता माझं मोल ठरत होतं


जीव गुदमरला कासावीस झाला

तहान भूक हरपली ,कसली वेळ आली

म्हसोबाला म्हटलं साकडं घालावं

पण काय आश्चर्य म्हसोबानंच कोंबड मागवं..?


म्हटल मनात देतो कोंबडं तुला

पण एकदा सुटका कर

म्हसोबा म्हणाला डर के आज जीत है


मी म्हंटल गर्दन कटनेपर

क्या जीना और क्या मरना


म्हसोबा हसला त्याचा भक्त आला

बोट तुटका पाय पाहून गालात हसला

काय म्हाताऱ्या तुटक्या बोटाचं हे

याला कोण म्हसोबाला देतंय व्हय...?


चमकलो चरकलो आनंदलो

म्हटल म्हसोबाच पावला

म्हातारा बी कावला आणि

त्यानं मला सोडून दिला.....!!!


Rate this content
Log in