STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

काय चुकीचे वागतो मी?

काय चुकीचे वागतो मी?

1 min
27.5K


दोस्त हो आज विनम्रतेने नमस्कार करतो मी

खदखदणारी एक समस्या तुम्हापुढे मांडतो मी

कागदावर वाकडे तिकडे चार शब्द सांडतो मी

कवितेतून व्यक्त होतो काय चुकीचे वागतो मी ।।१।।


राब राब राबतो मी मुले, पत्नी अन् घरासाठी

तीच मुले, तीच पत्नी भांडतात मज पैशासाठी

कंटाळून मग नादाला या कवितेच्या लागतो मी

कवितेतून व्यक्त होतो काय चुकीचे वागतो मी ।।२।।


तेल आणा, तूप आणा, मीठ आणा, पीठ आणा

मीच आणतो किराणा ओढतो मी संसार घाणा

किराण्याच्याच कागदावर चार रेघा ओढतो मी

कवितेतून व्यक्त होतो काय चुकीचे वागतो मी ।।३।।


तुटपुंजाच पगार माझा हो संसारालाच पुरेना

कविसंमेलनास जाण्यास दमडी काही उरेना

खिशातले चणे फुटाणे खात तेव्हा हिंडतो मी

कवितेतून व्यक्त होतो काय चुकीचे वागतो मी ।।४।।


झेपत नाही प्रवास खर्च म्हणून पायीच हिंडतो

निसर्ग दर्शन घडण्याचा आव मोठा मी आणतो

येईल तसे चार शब्द संमेलनामध्ये मांडतो मी

कवितेतून व्यक्त होतो काय चुकीचे वागतो मी ।।५।।


मिळालेले प्रमाणपत्र बायकोला जेव्हा दावतो

"घाला तिकडं चुलीत" तिचा राग उफाळून येतो

प्रमाणपत्र, कवितेचा कागद लपवू लागतो मी

कवितेतून व्यक्त होतो काय चुकीचे वागतो मी ।।६।।


Rate this content
Log in