काय आहे....?
काय आहे....?
तू असावे की नसावे, प्रश्न तोच पुन्हा आहे
रोज नव्या रातीला, गर्द अंधार पुन्हा आहे
मी जगावे की न जगावे, मरण यातना रोज आहे
प्रक्षोभ झाल्या मनाला, ओली वेदना रोज आहे
प्रेम करावे की न करावे, रोजचाच बहाणा आहे
स्पंदनात घेरल्या हृदयाला, तुझ्या नजरेचा बहाणा आहे
स्वप्न पहावे की न पहावे, स्वप्न उघडया डोळ्याचे आहे
दिस सरता काळोखात, मिटल्या डोळ्याचे स्वप्न आहे
मित्र करावे की न करावे, दुःख फार झाले आहे
सुख वेचाया बहुत धावले, दुःख एकट्याचे झाले आहे
मान घ्यावा की द्यावा, कळेनासे होत आहे
घेतलेल्या सन्मानाचे, ओझे फार मोठे होत आहे
मी माझे व्हावे की जगाचे, रीत सांगा खरी काय आहे
जग घेरले मनाला, ऐकायचे नेमके कोणाचे काय आहे?