*काव्यमय कोडे*
*काव्यमय कोडे*
1 min
14.9K
गोल गोल आहे मी
रंग माझा पिस्ता हिरवट
चवीला आहे आंबट तुरट
औषधी आहे मी
पचनास उपयोगी मी
पित्तशामक आहे मी
पाकात मला भिजवतात
जेवण होताच तोंडात टाकतात
बनवतात माझी सुपारी
जेवणानंतर खातात दुपारी
एकच बी आहे मला
मला पाहताच पाणी सुटे तोंडाला
इंग्रजीत आमला माझे नाव
आता मराठीत सांगा माझे नाव.
