काव्यमय कोडे
काव्यमय कोडे
1 min
367
अभंग व कीर्तनात
आहे मला मोठा मान
लाकूड नि पत्र्याची मी
घनवाद्य छोटे छान.
भाग माझे मुख्य दोन
धरतात बोटांमध्ये
जाडसर भाग एक
असतो अंगठ्यामध्ये
मधुर नाद निघतो
पातळ झांजामधुनि
डाव्या हाती धरी मज
देवर्षी नारदमुनि
कीर्तनात ,भजनात
टाळ माझा मित्र खरा
तीन अक्षरांचे नाव
सांगाल का तुम्ही जरा.
