काव्यमय गोष्ट
काव्यमय गोष्ट
1 min
27.2K
जन्मोत्सव शिवबाचा झाला
शिवनेरी गड साक्षीला ॥१॥
तोफांची सलामी बाळराजेस
सनई, चौघडे वाजती खास ॥२॥
माता जिजाऊ आनंदली अंतरी
पिता शहाजी कतृत्ववान भारी ॥३॥
जनतेच्या सुखाला आली भरती
मांगल्याचा दिन शिवनेरीवरती ॥४॥
जल्लोषात साजरा जन्मोत्सव शिवबाचा
आनंद लुटला समस्त रयतेनं भोजनाचा ॥५॥
