STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

काव्यदिप

काव्यदिप

1 min
566


तेजाळला काव्यदिप

वेदनांची फुले झाली

झंकारले शब्दसूर

सुखस्वप्ने साकारली।


साद भावनांची आता

शब्दासवे व्यक्त झाली

तेजोमय प्रतिभेची

सरस्वती बहरली।


गंधाळली रातराणी

मुक्यानेच व्यक्त झाली

चांदराती चांदण्यांची

चांदफुले जणू ल्याली।


तिमिर दाटता भोवती

काव्यदिप प्रकाशला

सुविचारा संगतीने

भाव मनी मोहरला।


हीच मनीषा जीवनी

पूर्ण व्हावे हे मागणे

काव्यदिपासवे उजळो

दुरितांची ही जीवने।


Rate this content
Log in