STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

कालाय तस्मै नमः

कालाय तस्मै नमः

1 min
186

निराशेचे पांगतील मेघ, मनोहर होईल उषःकाल,

अनिल वाहेल निर्मळ, अवनीला गवसेल ताल!


समयचक्र फिरून पुन्हा, दिन येतील पहा हर्षाचे,

'कालाय तस्मै नमः', गात, करू स्वागत नववर्षाचे!


अलविदा २०२०, तुझे धडे,शिकवलेले नेहमी स्मरू,

बनून शलाका ज्ञानाची, आनंद अन प्रेम पसरू!


वेळ निष्फळ नसते कधी, नवीन आवडी जोपासल्या,

हरवलेले छंद गवसले, अनुभव पाट्या गिरवल्या!


स्वास्थ्य, सुख, समृद्धी हे, मिळेल फलित संयमाचे, 

देईल आशिष सृष्टी, पुन्हा, उगवतील अंकुर उत्कर्षाचे!


Rate this content
Log in