ज्योतीबा
ज्योतीबा
1 min
13.4K
डोळस विचार
शिक्षण इंग्रजी
करी चिरफाड
ज्योतीबा धर्माची ॥१॥
शिक्षण स्त्रीयांना
मानसात आणी
सावित्रीमाईला
सुशिक्षीत करी ॥२॥
आसुड शासना
शेतकऱ्या साठी
हौद तो पाण्याचा
खुला सर्वांसाठी ॥३॥
शिवाजी राजांची
शोधली समाधी
शीवजयंतीची
सुरवात केली ॥४॥
