जनसंकट
जनसंकट
संकटाहूंनी मोठे कैसे हे संकट।
कैसे व्हावे बळकट सांग राजा।।
जनसमुदाय केवढा धरणी मातेला।
पोटाला न भाकर मिळे दोन वेळा।।
दाह फोडते पृथ्वी पाणी मिळे न पोटभर।
किती करावी भृमंती न लागे डोळा।।
पर्यावरण अशक्त झाडे सरण झाली।
मुक्या जीवासी हाल दिस होई काळा।।
रोजी रोटीला गृहन ज्ञानी मस्तके दहन।
फिकीर लागे जिवासी न थेंब आभाळा।।
माणूस जातीची ही वृद्धी किती होईल रे देवा।
थोडा नसे हा घोर लागे संकटाची झळा।।
आता होऊया जागृत करू शर्थीचे प्रयत्न।
करू नियम सायास घालू जनसंख्येसी आळा।।
थोडे होतील कष्ट थोडे लागेल मनी बळ।
भरवाया सोनियाचा घास लेकरू बाळा।।
सारे होऊनिया एक वाट सारे एक धरू।
करू आनंदाचे क्षण थोडका जण मेळा।।
नको गालबोट मानवा नको श्राप घेऊ जीवा।
पुढच्या पिढीस देऊ सुखी भविष्याचा मळा।।
