STORYMIRROR

Raghu Deshpande

Inspirational

3  

Raghu Deshpande

Inspirational

जननी

जननी

1 min
55

असेच पाहीलें होते स्वप्न तेव्हां

छोट्या वयाचा बाळ होतो जेव्हां

आईचा पदर जगाचा आरसा

राग लोभ द्वेष न कळें फारसा

मनाचेच राज्य मनात हसावें

मनातील भिती आईसी कथावें

बिलगूनी मग तिला फुटें पान्हा

गोंजारिले प्रेमे म्हणे कृष्ण कान्हां

मायेची ती उब पुन्हा नसें आली 

यशाची शिखरें वांझोट्या महाली 

फाटलें पातळ, त्यालें विस गाठीं 

जीव कासावीस होई माझेसाठी 

पैशाने गरिबी अपुरें साधन 

मुखावरी हसूं चित्ती समाधान...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational