जंगलभाषा
जंगलभाषा
1 min
28.4K
वरवर पाहता
जंगल मुके वाटले तरी
त्याच्या गहनगूढ प्रदेशात जाताना
आपली पावले वाजवीत शिरू लागतो
तेव्हा जाणवतं की
जंगल काहीतरी बोलतंय
जंगलातून येणारे अनामिक आवाज
आपण कान देऊन ऐकतो
आणि समजून घेऊ पाहतो
त्यांचे अदभूत अर्थ
पण ते कळायला
जंगलात सामावून जावं लागतं
तेव्हा कुठे उमजते
जंगलभर गुंजणारी जीवनभाषा
जिचा सूर सहसा जुळत नाही
आपल्या बेसूर भाषेशी.
