जमले तुज सहजपणे
जमले तुज सहजपणे
1 min
14K
आठवणींची पाने ती सारी
मनात अजुनी ताजेपणे
काढुनी सारी टाकणे कसे
जमले तुज सहजपणे …!
विसरुनी जाईल तुजला
मनास नाहीच ते जमले
विसरुनी सारे जाणे कसे
जमले तुज सहजपणे …!
कित्ती वेडा आहे मी, मज
समजे वेड ओसरल्यावरी
निर्लेप रहाणे नंतर तरी
जमले तुज सहजपणे …!
ही दुनिया आहे कठोरांची
माणसेही तशाच मनांची
अपवाद नाही तू ही याला
मना सांगेन मी सहजपणे ….!
