जमाखर्च
जमाखर्च
जमाखर्च आताच लिहतोय आनंदाचा
दुख्ख जमा आहे पण खर्चत नाही देतही नाही
भोगतोय दुख्ख मी एकटाच आनंद देत
आनंदाची कमी नाही आनंद मी देतच सुटलो
दुख्ख मग साठवतच बसलो ह्दयांत बंदिस्त
आनंद क्षणाक्षणाला देतो दुख्ख मनभरही घेतो
तरीही जगात माझी किंमत केली खुपच स्वस्त
जो उठतो मागतो रिता झालो तरी मी देतोच म्हणतो
लाज वाटते माझीच मला बेशरम जगताना
नाही म्हणणं जमत नाही वसुल मी करतच नाही
हद्द ओलंडतात ओरबडतात तरीही मी शांतच
वेळ मला येवुन गेली तेव्हापासुनच दया दुकान बंद नाही
बंद झालं तरी मी चालु ठेवतो अर्धी भाकरी राखुन खातो
आभाळाची माया इवल्याशा माझ्या ह्दयांत
उपाशी मी पाय पसरतो पाण्याचा घोट घशाखाली उतरवतो
प्रेमच प्रेम ह्या जगण्यात सुखी रहावं सर्वानी हेच मनात
