जलसमस्या
जलसमस्या
1 min
41.9K
छोटंसं रोपटं
आलं खुशीत.
बरसेल पाणी
घेईन मिठीत.
पाऊस धारा
झेलीन खुप.
न्हाऊन माझे
खुलेल रूप.
पाहून वाट
रोपटे दमले.
हळूहळू मग
सुकू लागले.
पाण्यावाचून
रोपटे मेले.
मरताना एक
बोलून गेले.
'वृक्षतोड ही
आता थांबवा
असाच तूही
मरशील मानवा'
,पाणी मिळाया
लाव झाडे खुप
मगच मिळेल
पाऊस खुप'
