STORYMIRROR

vishal lonari

Others

2  

vishal lonari

Others

जखमी व्हायला झालं

जखमी व्हायला झालं

1 min
3K


आतून

कदाचित कुणीच केला नसेल

माझ्या चांगल्याचा विचार

आणि वाहिल्या असतील

लाखोंनी शिव्याशाप

ज्याच्या पाशांनी घट्ट आवळले मग

त्यांना समजले

मला मात देणे सहज शक्य आहे

म्हणून माझ्या चिरडून टाकायचा प्रयत्न केला

पहिल्यांदी माझ्या मनाला

मग संवेदनांना

त्यांचा विचार असेन, असेच संपवता येईन मला

म्हणून त्यांनीही केला विचार

हास्यास्पदच म्हणावं पण

काळ्या बुद्धीने केला त्यांनी हा विचार

मला जखमी करायचा

जखम करायची तर

चिरफाड होते, आघात होतो

चिथळवून काढलं जातं

बेजार, लाचार बनवणारा

स्वैराचार त्या श्वापदांचा

डाव यशस्वीही झाला, मला

नेस्तनाबूत करण्याचा, उध्वस्त करण्याचा

पुढे पुढे पडणारी पाऊले

आता पडताय  रक्तरंजीत होऊन

दहशतीच्या सावटाखाली खुंखार त्याची खेळी

चिरडून गेलीये मला….........

जळून खाक झालेलं जंगल पुन्हा वसतं

कोरडाठाण प्रवाहित होतोच नदीचा

किती छाटले खोड तरी झाड वाढतच तग धरुन

जिद्दीच्या ज्वालामुखीच्या धगाची

नाही होऊ शकणार तुलना

कधीही तुमच्या इर्ष्येच्या वणव्याशी

आसमंतात रंग उधळण्यापासून

अन हे विश्व व्यापून टाकण्यावाचून

 कुणीही अडवू शकणार नाही सचोटीला

खवीस अहंकार तुमचा, करुन सोडेल नष्ट तुम्हाला

तुमचं बाहुबलच नेईल एक दिवस रसातळाला

गुलामगिरीचा अंधार नाही अडवू शकणार, आमचा सूर्य

बंडारुंची क्रांतीज्योती लवकरच पुन्हा

तळपेल


Rate this content
Log in