STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

4.5  

Dilip Yashwant Jane

Others

जखम

जखम

1 min
5.2K


रात्र भयाण काळोखी

अंधारल्या साऱ्या दिशा

कधी लाभेल प्रकाश

मनी वेडगळ आशा


उन्हं तापले ग्रीष्मात

नाही बहर वसंता

वाटे सारेच निरस

लोप किरण पावता


खुंटलेत मार्ग आता

भेगाळली स्वप्ने सारी

किती जपाव्या वेदना

दुःख लेऊन ते उरी


भळभळे जखमही

मनासंगे काळजात

नाही शीतल गारवा

कसे गावे आनंदात



Rate this content
Log in