जिनेंद्र
जिनेंद्र
1 min
27.3K
नश्वर देहाचा चालला रथ
घोडे जुंपले पंचन्द्रीय
मन सारथ्याच्या सोबत
ज्ञान अर्जी ज्ञानेन्द्रीय
आत्मान्द्रीय राजा थोर
पन मनाच्या लबाळीत
सैरावैरा घोड्या संग
सत्य मार्ग नाही ताळीत
मन सारथी लालची
भोग विलासाची वृत्ती
आत्मास.काबूत करुन
मन मर्जीने करतो कृती
अज्ञानाची चादर पांघरून
आत्मन्द्रीय झाले कलुशीत
व्यसनाधीन पंचन्द्रीयाची सोबतीने
अंत्मान्द्रीयाचे राज्य केले आशीत
या कलूशीत जीवनात
सत्य ज्ञानाची ज्योत लावून
भगवान वर्धमान महावीरांनी
आत्मान्द्रीयास घेतलं न्हावून
आत्मज्ञानाची तपस्या
छढरिपूवर विजय
पंचन्द्रयांचा स्वामी जिनेंद्र
या महावीरांचा जय
