जिलेबी...!
जिलेबी...!
जिलेबी म्हंटल्यावर
तोंडाला सुटलं पाणी
जे पळून गेल होतं
पाहून आणीबाणी
१५ऑगष्ट ,२६जानेवारी
१मे ची असते प्रत्येक वर्षी वारी
त्याच दिवशी खेडोपाडी
जिलेबी लावते हजेरी
आंबवलेली चना डाळ
पिठाची ही किमया सारी
रूप घेतसे सोसुनी तळणी कढईतली
नेसण्या साखर पाकाची सारी
वेटोळ्यांचे रूप गोंडस
जरा तांबूस केशरी
जणू फेटा जिभेवर रुळे
ताजा तवाना गोड जरतारी
पाक कलेची उत्तम करणी
पोटाची होते सुंदर भरणी
राष्ट्रीय सणाला येते दारी
साजरा सण करण्या घरोघरी
आजही ताटा मध्ये विराजते
देशभर मोठया ऐटीत
तिला पाहून सारे विसरून
एकी टिकते पंगतीत
हीच आपल्या देशाची शान
उंचावते जगी आपली मान
गातो आम्ही एकीचे गान
भारत देश आहे आमचा महान...!
भारत माता की जय...!!!
