जीवनज्योत
जीवनज्योत


जीवनज्योत जळते आहे
जळते आहे मशाल
झुगारुन बंधने मर्यादेची
मर्यादेची खुशाल।।
निरागसता शिकवून गेले
गेले बालपण थोर।
तेथे न कोणी लहान मोठा
मोठा ना कोणी, साव ना चोर।।
तारुण्यात विषय वासना
भविष्यासाठी धडपड।
बेरीज केवळ स्वहिताची
परदुःखाचा नाही मेळ।।
वार्धक्यात केवळ मनी
पश्चात्तापाची भावना।
सरले जीवन, उरले खालीपण
जगलोच नाही जणू या जीवना।।