जीवनावर आधारित कविता
जीवनावर आधारित कविता
1 min
5.3K
स्वप्नसारथी
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
स्वप्न नक्कीच पाहत राहावी
एकटे स्वप्न पाहण्यात नाहीय मजा
तिथे स्वप्नसारथीची साथ असावी
घेऊन स्वप्नसारथीची खंबीर साथ
मीही स्वप्नांना अलगद दिलेला हात
आयुष्यातील स्वप्नांचा हाकताना रथ
होती रथाला स्वप्नसारथी सख्याची सोबत
स्वप्नांचा रथ माझा अचूक निघालेला
कारण स्वप्नसारथी त्याला योग्य मिळालेला
पण अवचित काहीतरी विपरीत घडले
स्वप्नसारथ्याचे जीवनच संपले
जीवनरुपी रथाचा स्वप्नसारथी हरवला
आयुष्याच्या वाटचालीचा मार्गच संपला
स्वप्ने सारी तशीच ठेवून गेला एकला
काय सांगू माझा स्वप्नसारथीच हरपला
©श्रीमती साईली राणे,ठाणे
