STORYMIRROR

kishor zote

Others

4  

kishor zote

Others

जीवनाच्या वाटा

जीवनाच्या वाटा

1 min
400


जीवनाच्या वाटा


चला पार करूया

वेचूनिया तो काटा

सुकर होतील मग

या जीवनाच्या वाटा


आयुष्याचा हिंदोळा

चढ उतार त्या लाटा

दूर करून चला मग

या जीवनाच्या वाटा


सुख आणि दुःख

आयुष्याचा कोटा

हसत सामोरी जा

या जीवनाच्या वाटा


मित्र सगे सोयरे

जपा जशा नोटा

रोकडा होई व्यवहार

या जीवनाच्या वाटा


उने अधिक होईल

कधी नफा कधी तोटा

गणित ते सोडवतात

या जीवनाच्या वाटा


जीवन मरण सत्यच

घालाव्यात का खेटा

संपता संपेनात का ?

या जीवनाच्या वाटा


साहित्याला गुण द्या
लॉग इन