जीवनाचा आधार गुरू
जीवनाचा आधार गुरू


जीवनाचा आधार माझ्या
दिली ज्ञानाची शिदोरी
दाखविला मार्ग सत्याचा
ज्योत पेटविली अंतरी।।
जीवनाला अर्थ मिळाला
गुरूंच्या सान्निध्यामुळे
ध्येय गाठण्याचे वेड
मनास लागले गुरुंमुळे।।
ज्ञानारूपी अमृत पाजुनी
सुज्ञान केले आम्हाला
जीवनाचा अर्थ उमगला
लाविता मस्तक गुरुचरणांला।।
ऋण असे हे न फिटणारे
आहे गुरुंचे माझ्यावरी
होता येणार नाही उतराई
कोणतीही गुरुदक्षिणा दिली तरी।।