जीवन
जीवन
1 min
14.8K
जीवन ऐक परिवर्तनाची उपेक्षा
येथे ठेऊ नये कुणाची अपेक्षा
दुष्ट कर्म करणार त्यास मिळे शिक्षा
जीवनची आपुले ऐक परीक्षा ॥१॥
किम्मत फक्त येथे पैशाची
ना आपल्या जीवनाची
येथे किम्मत फक्त मी पणाची
अजून आपुल्या निरर्थक स्वार्थाची॥२॥
येथे किम्मत नाही भावनाची
ना किम्मत तुमच्या स्वभावाची
किम्मत फक्त फसवणूकिची
आणि कुणा सज्जनास लुबाडन्याची॥३॥
संपत्तीच्या मोहपायी जन्मले दुराचारी
स्वतःला भोगकर्म दावुनि बनले शिस्टाचारी
कित्येक अत्याचाराला बळी पडलीया नारी
तरी नराधम कायद्या ना भारी॥४॥
