जीवन ( सहाक्षरी )
जीवन ( सहाक्षरी )
1 min
460
वाहता निर्झर
असावे तसेच
जीवन आपले
सहज सुंदर
प्रत्येक क्षणाचा
लुटावा आनंद
कधी अलगद
हातात स्वानंद
आपले परके
कोणीच नसावे
मैत्री भावनात
जग ते दिसावे
आनंद आपला
वाटत चालावा
मुखी प्रत्येकाच्या
प्रसन्न दिसावा
संकटे अनेक
मजबुत करी
शांतता राखत
धीर तुच धरी
