STORYMIRROR

kishor zote

Others

1  

kishor zote

Others

जीवन एक संघर्ष ( काव्यांजली )

जीवन एक संघर्ष ( काव्यांजली )

1 min
3.2K


मुळ मंत्र

जीवन एक संघर्ष

त्यातच उत्कर्ष

मनुष्याचा...........१


प्रत्येक क्षणी 

साथ ती दयावी

सत्कर्मे करावी

सदोदीत...............२


न्याय हक्कास

कधी ना विसरावे

महापुरुषा स्मरावे

नेहमीच.................३


गुलालामा गुलामीची

आठवण करून दयावी

स्वप्ने साकारावी

बाबासाहेबांची............४


प्रज्ञा शील

करुणा त्री रत्ने

मिळवावी यत्ने

जीवनात...................५


प्रत्येक वाटेत

येतील ती अडथळे

करावी आत्मबळे

पार...........................६


सुवर्णास तप्तता

अधिकच ती उजाळते

जीवन घडते

बावनकशी...................७


शिका संघटीत

व्हा संघर्ष करा

जीवनी धरा

संकल्प......................८


संघर्ष आठवावा

बहुजन साऱ्या महापुरुषांचा

दिसेल सुखाचा

राजमार्ग.....................९


संघर्षामुळे जीवनी

आहे मजा पाहा

लढतच राहा

हिमतीने....................१०


साहित्याला गुण द्या
लॉग इन