STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

जीवन एक रंगमंच

जीवन एक रंगमंच

1 min
916


गर्भ पोसला मातेने उदरी

नऊमासांनी जीवनमंच मिळाला

बाललिला दाखवून जगाला

वाढत बालक हा विकसित झाला


अनुभवांनी घडविला कलाकार

जीवनपट हळूहळू रंगत गेला

प्रसंगानुरुप वर्तन बदलणारा

असा कलाकार बनला अवलिया


सुख दुःखाचे उन्हाळे पावसाळे

अनुभवातून शिकत राहिला

जगात आपली अवीट छबी तो

स्वकर्तृत्वाने निर्मित राहिला


प्रवाहासोबत वाहत राहणे

कधी वाटले सोपे तयाला

प्रवाह विरोधी वर्तन करता

वादळी रुप आले जीवनाला


जीवन एक रंगमंच असा की

निर्माता तयाचा प्रभु परमेश्वर

कलाकार असू आपण सारे

जरी जीव हा असला नश्वर


जन्म मिळाला जेथे जसा ही

घडत जावूया जमेल जिथवर

रंग अंगचा उधळूनी जीवनी

उड्डाण मारुया जमेल तिथवर


रंगमंचावर शोभे न मी एकटा

मला ही हवेत कलाकार सोबती

दीन दुबळे दुःखी दलित जे जगी

मीच बनेन या सर्वांचा सांगाती


हसत हसवत सोडेन हा रंगमंच

जीवन जगण्याची शिकूनी कला

जरी उद्या मी नसेन या रंगमंची

तरी आठवेल जग नक्कीच मला!!!



Rate this content
Log in