STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

जीवाशिवा

जीवाशिवा

1 min
14.2K


मान मान जीवा शिवा

आहे तुमचाच मान

पोळ्याच्या सणाला

करतो आम्ही सन्मान

जीवा शिवा।।धृ।।


पोळ्याच्या सणाला

करतात बरे काय

खांदेमळन बैलांची

धुतात त्यांचे पाय

जीवा शिवा ||१||


जीवा शिवा कष्टाळू

करतात खुप काम

पोळ्याच्या सणाला

करा की आराम

जीवा शिवा ||२||


चढली झूल अंगावर

गळ्यात घुंगुरमाळा

गोंडे शोभती शिंगाला

पायी छुमछुम वाळा

जीवा शिवा ||३||


मिरवणूक तुमची

वाजती ढोल ताशे

वर्षाच्या कामातून

व्हा मुक्त जरासे

जीवा शिवा ||४||


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍