झुंज
झुंज
1 min
3.0K
हा देव शिर्डीचा, साक्षात भेटणारा
मग काळजी कशाला, काळाशी झुंजणारा।।धृ।।
चिंता करू कशाला, चिंतनी मन रमले
व्यर्थ रडू कशाला, दुःखात साई दिसले
कर्माच्या पंगतीला, सत्कर्माने तृप्त झाले ।।१।।
मागू कुणा कशाला, मिळे काम या हाताला
लाजू कुणा कशाला, माझा दैव सोबतीला
सटवाई च्या लेखणीला, नवा अर्थ प्राप्त झाला ।।२।।
जाऊ कुठे कशाला, भजनात साई रंगला
दाऊ कुणा कशाला, हृदयात साई रमला
मग स्वर्ग तो कशाला, वैकुंठ दारी आला ।।३।।
।।सद्गुरू साईनाथ महाराज की जय ।।
