झुंज मुंज पहाट
झुंज मुंज पहाट
झुंज मुंज पहाटेच्या तांबड किरणांचा जणु सुर्यच सोने आज उधळतो
रात्रीच्या अबोल शांततेचा आता घेऊन अडोसा सुर्य आज उगवतो...
सोनेरी किरणांचा सडा रोज प्रमाणे रानमळी, डोंगरपठारी बेधुंद उधळतो
नवचैतन्य,नवतारुण भरले प्रत्येक मनी जीवनाचा प्रत्येक क्षण तो उधळतो....
जागले रान आता, जागले पक्षी जागल्या वेली जागले वृक्ष सगळी पायवाट ही होऊन आता जाग्या जागले आता कोंबडीच्याबागणे शिवार सगळी उठल्या सुनवाऱ्या घरोघरी सडा सारणाचा पाट आता घेऊनी सजलेल्या आंगणात सजवते ती सौख्याची आता रांगोळी..
त्या प्रत्येक जणी.. वासुदेवानंद ,देवकीनंदन, केशवामाधवा, साद या भाव गिताचा पडती हो कानी उठा उठा गजमुख नाद मला उठवे वासुदेवाच्या गितानी जागी मग मनी...
किलकिलाट या पक्षाचा मधुर असे संगीत झराचा खळखळून वाहणे असे गीत झाडावर हलणाऱ्या पानांचा सलसलाट या सगळ्यात मला वाटे गीत संगीत...
आलो शहरात सगळे झाले आता विरळ सुर्योदय केव्हा होतो हे कळत नाही अवतीभोवतीला फक्त दिसतात ईमारती कधी कधी सुर्याचे दर्शन होत नाही...
हरवली झुंज मुंज ती पहाट हरवले आता ते गीत संगीत हरवल्या त्या वाटा आता उरले क्षण आता आठवणीत
