झुंज माझ्या आयुष्याची
झुंज माझ्या आयुष्याची
1 min
171
स्वैर मी, रानभैर मी,
मोकाट नाही, मुक्त मी,
आयुष्य हे रण नाही,
ते तर जीवनगाणे,
धुंद तराणे!
पण स्त्री जन्मास
सप्तरंगी कमान नाही,
सोसण्याची बंधने!
का पायदळी तुडवता,
का ओज तिचे अव्हेरता?
दुर्गा म्हणून आरती करता
आणि दासी म्हणून भोगता?
ही श्रुंखला तुटायला हवी,
काळी परंपरा सुटायला हवी!
माझी यशोगाथा मी गायला हवी,
झुंज माझ्या आयुष्याची,
बस! मी आता झुंजायला हवी!
