झोन ( सहाक्षरी )
झोन ( सहाक्षरी )
1 min
11.9K
कोरोना प्रसार
साऱ्या जगतात
महामारी त्यास
सारे म्हणतात
लढण्यास सज्ज
मानवी जमात
लॉकडाऊन ते
बसली घरात
जगच थांबले
पृथ्वी शांत शांत
भीती दाटलीय
प्रत्येक श्वासात
पृथ्वीवर झोन
तीन विभागात
लाल पिवळा नि
हिरवा सुखात
