झेप
झेप
1 min
228
झेप
झेप नारीची आज स्वकर्तृत्वाने
नव्या युगात वावरते जिद्दीने
तंत्रज्ञान अवकाशीचेही ज्ञात
जणू गरूड भरारी अंबरात
घर परिवार सावरी नेटाने
साऱ्या गरजा पुरवीते स्नेहाने
झेपेसाठी गगन ठेंगणे तीला
नका समजू स्त्रीशक्तीला अबला
मनोभंग,क्रौर्य किती छळणार
प्रगतीची वाट नार तरणार।
नका खुडू आता अंकूर कोवळा
जन्म लाडकीचा होऊ द्या सोहळा
