STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others

4  

Abasaheb Mhaske

Others

झेप घेवूया फिनिक्स होऊन पुन्हा

झेप घेवूया फिनिक्स होऊन पुन्हा

1 min
400

कवी आणि कवितेच काय असत नातं ?

धान्य असते कविता , कवी भरडणार जात

अश्वस्थ मनाची घालमेल त्याला लिहत करते

धमन्यांमधून रक्तासारख जणू ती वाहते


कुणी निंदा , कुणी वंदा त्याला

तो लिहतंच राहतो कविता

कारण कविता त्याचा श्वास

श्वास थांबला की संपला प्रवास

कविता आणि कवी नाण्याचं दोन बाजू

छापा काटा काहीही पडला तरी हार ठरलेली

तमाशाने समाज बिघडला नाही अन

कीर्तनांनी सुधारला नाही कधी


कवी होतो वरुणराजा कविता होते धरा

हरकतो चातक जणू म्हणे पेर्ते व्हा

कवी बळीराजा कविता सृजनाचे प्रतीक

हिरवे स्वप्न मनी ठेवू वाईट जरी अतीत


लोकशाहीची सुपीक जमीन कसली चिंता

सर्वकंष क्रांतीसाठी मशाल हाती घेऊ चला

न्याय , स्वातंत्र्य समता , बंधुता अंगिकारू

मिळून सारे झेप घेवूया फिनिक्स होऊन पुन्हा


Rate this content
Log in