झेप घेरे माणसा
झेप घेरे माणसा
1 min
187
झेप घे रे माणसा
वैभव असावे आकाशी
जाऊन भेट देवाला
जो ह्दयात आहे उपाशी
चाले सुखदु:खाचा हा खेळ
ऊन सावली हे नभांगण
शर्यत लावितो कोणी
पोटासाठी तर हे क्रिडांगण
अशी झेप घेरे माणसा
तिमीराचा होईल अंत
विज्ञानाची धरुन कास
सोबतीला येती साधुसंत
भटकशील जेव्हा दाहीदिशा
संस्कारांची होऊ दे जाण
अंधश्रद्धेचा करुन नाश
वाट तु रे कष्टाचे वाण