झाले समाधान!
झाले समाधान!
1 min
4.4K
झाले समाधान.....!
(दत्त गुरू दर्शनाने)
झाले समाधान
वाडीस येऊन
गुरुराया तुला रे पाहून
कृष्णा काठी
नौका विहार अनुभवण्या
आलो रे फिरून
विशाल पात्र
पाणी रे संथ
घेतले हृदयी भरून
दर्शन मात्रे
मिळाले सुख
अंतर गेले सुखावून
प्रसादाची त्यावर
गोड रे मेजवानी
पोट भरून
खरे सांगतो गुरुराया
सुखाचा दिवस
भोगून गेलो भारावून
अशीच कृपा तुझी
आम्हास लाभू दे
इथे येणे सदैव घडू दे
दर्शनाचा योग
वारंवार येऊ दे
मन असेच आमचे
आशीर्वादाने सदा
तृप्त होऊ दे....!
