झाडीचा महिमा
झाडीचा महिमा


काय सांगू तूमाले झाडीचा महिमा,
यात आहे दर्जेदार नाटकाची गरिमा |
ऐकले असाल तुमी हॉलीवूड बाॅलीवूड,
आमच्या येथं आहे छान झाॅलीवूड ||
झाडीचे लोकं मनाचे फार मोठे,
काहीबी करतात असेल काम छोटे |
शेती करावाले मोठा मन लागते,
वावर खोदावाले कुदर फावडा लागते ||
झाडीच्या भागात जंगल मोठा आहे,
बाहेरच्यायले लागते नक्षल्यायची चंबल आहे |
म्हणून त सयरातले लोक येत नाही,
आमचा गावाकडचा विकास काही होत नाही ||
माय म्हणे पोराले मोहा वेचू आपण,
टोरीचा तेल काढून गाडा माखवू आपण |
वावरात जाऊन चारा कापून आण,
गाईले चारा टाकून दुध काढून आण ||
सयरात गेले कमावले झाडीचे पोरं,
जमिन सोडली अन सोडले सारे गुरं |
तुमची जमीन आमाले दलदल लागते,
घरी येऊन पोरगा बापाले कलकल सांगते ||