जगण्याची कला
जगण्याची कला


भेटणारा प्रत्येक जण चांगला या गफलतीत राहु नको
लोक दिसतील बाहेरुन चांगली तु दिसण्यावर जाऊ नको
गुलाब पाहिजे न मग आता काट्याकडे तु पाहु नको
संकट आलीत तर येऊ दे तु रडकुंडीला येऊ नको
रडगाणं हे दुनियेचे ते तु तरी आज गाऊ नको
तु दिवा स्वत: हो कुणावर अवलंबुन राहु नको
श्रीकृष्ण नाहि प्रत्येक म्हणुन विश्वास जास्त ठेवु नको
तुझ्या जिवनाचा दोर दुसऱ्याच्या हाती तु देऊ नको
विनाकारण कुणाला जिवनात आपल्या ओढु नको
मरण येईल तेव्हा येईल तु जगणे मात्र सोडु नको
जपुन ठेव प्रत्येक क्षणाला कशालाही खोडु नको
चारचौघासारखा आहे तु पण त्यांच्यासारखा घडु नको