जगणे इथेच आपले मरणे इथेच आहे
जगणे इथेच आपले मरणे इथेच आहे
1 min
681
जगणे इथेच आपले मरणे इथेच आहे,
तडजोड कशास ती सारे सोडणे इथेच आहे.
न येणारा तिथे कोणी सोबती आपल्या
हसणे सोबती त्यांच्या आपले रडणे इथेच आहे.
फुल सुगंधी शेवटी जाणारच ते सुकून,
दरवळणारा तो गंध फुलांना सोडणे इथेच आहे.
सुटले नकळत ज्यांचे हातून आपल्या हात,
राहो बांधलेले हाताशी हात जोडणे इथेच आहे.
उरते फक्त नाव आपले गेल्यानंतरही आपल्या,
नावासाठी त्या मग कर्म चांगले करणे इथेच आहे.
