जगणे हे जगतांना
जगणे हे जगतांना
1 min
13.4K
जगणे हे जगतांना
ठरवता येते अगोदर
नकारात्मक कधीच नाही
सकारात्मक ते खरोखर ...!
प्रवाह विचारांचा अखंड
वाहतो मनात आपल्या
विधायक प्रवाह असावा
विध्वंसक प्रवाह नसावा ..!
वेळ आली समजावण्याची
एकाकी माणसाला आजच्या
बाहेर पड गुहेतून निराशेच्या
घे उभारी अन सावर जरा ...!
जगणे हे जगतांना
वजा करावे स्वतःला अन
मिसळूनी जावे सगळ्यात
जाणवेल अर्थ आहे जगण्यात ..!
