जगायचे राहून गेले
जगायचे राहून गेले
भविष्याचा विचार करताना
वर्तमानाला वाहून नेले
सुख उद्याचे पाहण्यासाठी
आज हसायचे राहून गेले
कोण काय म्हणेल याचा
विचार मन करत गेले
दुसऱ्यांचा विचार करण्यामध्ये
स्वतःचा विचार करायचे राहून गेले
हार जीत, यशापयश
याचाच विचार करत गेले
स्पर्धा जिंकण्याच्या धडपडीत
जीवन जगायचे राहून गेले