STORYMIRROR

Vanita Shinde

Others

3  

Vanita Shinde

Others

जागतिक पितृदिना निमित्त

जागतिक पितृदिना निमित्त

1 min
28.5K


बाप माझा जन्मदाता

आहे जीवनी आधार,

सा-या घराचा पोशिंदा

डोई वाहतो तो भार.


रात दिन राबुनिया

किती जपतो लेकरा,

नाही त्यास रे उसंत

देतो प्रेमाने सहारा.


बाप वाटतो कठोर

त्याचे हळवे रे मन,

छत्र धरुनिया शिरी

सदा करतो रक्षण.


होता लेकरा वेदना

त्याचे काळीज फाटते,

तळमळ पाहुनिया

जणु हृदय तुटते.


केली जन्मभर पूजा

ऋण त्याचे ना फिटते,

अभिमान वाटे मनी

भाव अंतरी दाटते.


Rate this content
Log in