जागतिक पालक दिन!
जागतिक पालक दिन!


जागतिक पालक दिनाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!
काय दिवस आले बघा
आपणच आपल्याला
शुभेच्छा देऊन घ्याव्या लागतात....
पालक म्हणून
जीवन जगताना
बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात....
नवीन विचारांच्या गाठी
आपणच आपल्यासाठी
सोडवाव्या लागतात....
जुन्या गाठींना
प्रस्थापित करण्यासाठी
नव्या गाठी माराव्या लागतात...
साऱ्या गोंधळाचा
अर्थ इतकाच
आता लावावा लागतो...
साधं सोपं जीवन जगायचं म्हणून
दोन दगडांच्या कपरिच
जीवन पुन्हा जगतो...
तेंव्हा ते वडील धारे म्हणून
त्यांचं ऐकत होतो
आता आपण वडील धारे म्हणून
यांचंही आम्हीच ऐकतो...
म्हणून तर बाबांनो
आपणच आपल्याला
शुभेच्छा देऊन घ्यायच्या आहेत...
पालक दिनाच्या
अपेक्षा पुन्हा गाठ मारून
गठल्यात बांधायच्या आहेत....
सर्वांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!