जागृत व्हायला हवं
जागृत व्हायला हवं
1 min
423
पालकांनो तुम्ही आता
जागृत व्हायला हवं
आजच्या नव्या युगात
खंबीर उभं राहावं
बाहेरच्या घडामोडी
लक्षात घ्यायला हवी
मुलांच्या शिक्षणासाठी
ज्ञानज्योत पेटवावी
नका देऊ दडपण
नुसतेच अभ्यासाचे
खेळ खेळता खेळता
गुण येई नेतृत्वाचे
होईल हा खर्च थोडा
वर्तमानपत्र आणा
आवश्यक ते ज्ञान घ्या
तुम्ही मजबूत बना
मुलांच्या शिक्षणासाठी
पोटाला चिमटा देता
जडणघडणीसाठी
मग मागे का राहता
